LOGO
  • मुख्य पृष्ठ
  • गुरुकुल
  • विश्वस्त
    • विश्वस्त
    • अध्यापक मंडळ
  • संस्थेची कारकीर्द
  • उपक्रम
  • छायाचित्रे
  • संपर्क
  • देणगी
  • मराठी मराठी
    • English English

गुरुकुलाबद्दल

भारतीय संस्कृतीचे प्राण म्हणजे आपले वैदिक वाड्मय ! आपल्या प्राचिन ऋषिंनी अंतरज्ञानाने हे ‍‌‌‍मंत्र ग्रहण केले आणि पुढे गुरु-शिष्य परंपरेने त्यात प्राण ओतले.हेच भारतीय संस्कृतीचे वैदिक प्राण-परंपरा संवर्धनाचे कार्य श्रीक्षेत्र नाशिक मध्ये अनेक सहस्त्रांपासून अक्षुण्णपणे टिकून आहे.

नाशिकच्या वैदिक क्षेत्रात वैदिक सम्राट पं.श्रीकृष्णशास्त्री गोडशे गुरुजी,श्रौत भास्कर पं.नारायणशास्त्री भानोसे गुरुजी,शतपथ भास्कर पं.लक्ष्मीकांतशास्त्री दीक्षित तसेच पं.बापूरावशास्त्री अंबेकर(जोशी) या चौघांनी या साठी मोठे योगदान दिले.त्यांच्याच प्रेरणेने आणि आशिर्वादाचे फळ म्हणजे वैदिक ज्ञान विज्ञान संस्कृत महाविद्यालय(गुरुकुल) होय. संस्थेची स्थापना गुरुवार दिनांक.१८ मार्च १९९९ गुढीपाडवा या शुभदिवशी करण्यात आली.

गुरुकुलाची वैशिष्ट्ये

  • सात वर्षाचा १२ वी समकक्ष शासकीय मान्यताप्राप्त वेदविभूषण प्रमाणपत्र कोर्स.
  • कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ (रामटेक-नागपूर) येथील परीक्षांचीही तयारी विद्यार्थांकडून करवून घेतली जाते.
  • पुणे वेदशास्त्रोत्तेजक सभा या प्राचिन संस्थेच्या परीक्षांचीही तयारी विद्यार्थांकडून करवून घेतली जाते.
  • विद्यार्थ्यांसाठी निवास,नाश्ता,भोजन यांची नि:शुल्क उत्तम सोय.
  • शासकीय नियमात बसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास नियमानुसार शिष्यवृत्ती.
  • वेदांच्या शास्त्रोक्त शिक्षणाबरोबरच संस्कृत,कर्मकांड,ज्योतिष आदी विषयांचे मार्गदर्शन.
  • आधुनिक काळाची गरज लक्षात घेता इंग्रजी,गणित,सामाजिक विज्ञान,संगणक आदी विषयांचे सखोल अध्यापन.
  • विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रसंगानुसार विविध स्पर्धा व उत्सवांचे आयोजन.
  • वेद मुखोद्गत करून सुसंस्कारीत,चारित्र्यवान व समाजाला नेतृत्व देऊ शकणारे आत्मनिर्भर विद्यार्थी तयार करणे.

गुरुकुलाची नियोजीत वास्तू

सध्यस्थतीतील केवडीवन,पंचवटी येथील महाविद्यालयाची वास्तु नाशिक येथील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक व निष्ठावान वेदप्रेमी श्री.शशी जाधव यांनी इ.स.१९९६ साली महारुद्र यागाच्या वेळी पं.गोडशे गुरुजींना भूमिदान केली. तेथे स्वतः वास्तव्य न करता वेद्विद्येची पुढची पिढी तयार करण्यासाठी गुरुजींनी गुरुकुलास दिली.पुढे दानशूर दात्यांकडून ५ – ६ खोल्या आणि सभागृहाची उभारणी केली.

विद्यार्थ्यांची वाढती संख्या व गुरुकुल विकासाची व विस्ताराची आवश्यकता आहे. त्यासाठी १० वर्ग खोल्या,१५० विद्यार्थ्यांचे वसतीगृह, सुसज्ज सभागृह, यज्ञशाळा, गोशाळा, ग्रंथालय ,भोजनकक्ष, अध्यापक निवास, प्रशासकीय कार्यालय इ. ची गरज आहे.

भारतभरातील तसेच जगभरातील वेदप्रेमी,ज्ञाननिष्ठ,धर्मनिष्ठ सज्जन दानशूर दाते आपल्या वैदिक परंपरेचे जतन-संवर्धन आणि विस्तार करण्यासाठी तन मन धनाने मदत करतात.हि संस्था उभारण्यासाठी त्यांचा वाट मोलाचा आहे.

Any text goes here