श्री लक्ष्मीकुबेरयाग
तीर्थक्षेत्र नाशिकच्या या पवित्र भूमीत, वेदपुरुषाच्या कृपेने, शृंगेरी जगदगुरु प.पु. शंकराचार्य श्री विधुशेखर भारती स्वामीजी दक्षिणाम्नाय शृंगेरी शारदापीठम यांचे अधिष्ठानाने वैदिक ज्ञान विज्ञान संस्कृत महाविद्यालय गुरुकुलाचा विस्तार, प्रचार-प्रसार होण्याच्या हेतूने आणि गुरुकुलाची स्वहक्काची वस्तू होण्याकरिता तसेच विश्वकल्याणासाठी अतिदुर्मिळ असा “श्री लक्ष्मीकुबेरयाग” रविवार दि. १३ जानेवारी २०१९, वेळ: स. ११:०० ते १२:३० वा. करण्याचे योजिले आहे. अशा या दुर्मिळ यज्ञ सोहळ्यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहावे.
आमंत्रण पत्रिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
गुरुकुलात राबविण्यात येणारे उपक्रम
- वैदिक सम्राट प.पू.कै.श्रीकृष्णशास्त्री गोडशे गुरुजी यांच्या पुण्यास्मरणार्थ दरवर्षी भारतभरातील एका विद्वान वैदिकांचा राष्ट्रीय पंडित पुरस्कार देऊन याथायोग्य सन्मान केला जातो.
- वेद शास्त्रातील,कर्मकांडातील लोप पावत चाललेल्या प्राचिन यज्ञ याग परंपरेविषयी विद्वान पंडितांचे मार्गदर्शन शिबीर आयोजित केले जाते.
- वेद, उपनिषद ,कर्मकांड, अन्य प्राचिन ग्रंथ,याविषयी चर्चासत्र, व्याख्यान यांचे आयोजन केले जाते.
- गुरुवर्य गोडशे गुरुजींच्या स्मृती सामारोहानिमित्य दरवर्षी वेद पारायण आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
- सामाजिक बांधिलकी व धर्म,वैदिक परंपरा जपण्याच्या दृष्टीकोनातून संबधीत विषयावर तज्ञांची व्याख्याने आयोजित केली जातात.